Parbhani Crime : पारधी वस्तीवर घेराव घालून अट्टल गुन्हेगारास पोलिस पथकाने केले जेरबंद

आरोपी अनेक गुन्ह्यात पोलिसांसाठी वॉटेंड गुन्हेगार
Parbhani Crime : पारधी वस्तीवर घेराव घालून अट्टल गुन्हेगारास पोलिस पथकाने केले जेरबंद
Parbhani Crime : पारधी वस्तीवर घेराव घालून अट्टल गुन्हेगारास पोलिस पथकाने केले जेरबंद
Published on
Updated on

पूर्णा : सुकी येथील पारधी वस्तीवर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ता १७ सप्टेंबर रोजी घेराव घालून घरफोडी, दरोडा चोरीतील ४ वर्षांपासून फरार असलेल्या एका अट्टल गुन्हेगारास शिताफीने पकडून जेरबंद केले आहे.

एल सी बी पोलिस पथकाने पारधी वस्तीवर सापळा रचून अट्टल गुन्हेगारास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कमेसह १ लक्ष रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव अशोक उर्फ बहादूर विठ्ठल भोसले वय २५ वर्ष रा सुकी पारधी वस्ती ता पूर्णा असं आहे.

सदरील आरोपी अनेक गुन्ह्यात पोलिसांना वांटेड होता. त्याच्या विरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुरनं ३३२/२०२६,कलम ३३१(४),३०५ बि एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी विरुद्ध घरफोडी दरोडा चो-या करणे असे विविध गुन्हे दाखल होते. परंतू तो मागील ४ वर्षांपासून फरार होता.

फरारी असताना तो सुकी येथील पारधी वस्तीवर आला असल्याची गुप्त माहिती स्थागुशा पथकाला मिळाली होती. त्यानूसार,पोअ पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार अप्पर पोअ तानाजी चिखले, स्थागुशा पोनि गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ,पोह महेश कवठाळे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, राहुल परसोडे, माणिक वाघ, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार यांनी धाडसी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news