चारठाणा प्रतिनिधी
नांदेड–संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा जवळ असलेल्या माणकेश्वर पाटी परिसरात, कंधार आगाराची संभाजीनगरहून कंधारकडे जाणारी बस क्रमांक MH 20 BL 1709 ने जिंतूरहून चारठाण्याकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 21 W 3253 ला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार फेरोज इमामजी कुरेशी (वय 35, रा. चारठाणा) हा गंभीर जखमी झाला असून, त्याचा कमरेपासून एक पाय गेलेला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड, ट्रॅफिकचे जिलानी साहब शेख, हनुमान पावडे, रामकिशन कोंढरे, श्रीकांत कालवणे, कैलास खरात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमीला ॲम्बुलन्समधून जलील इनामदार, शारिक देशमुख, आरिफ कुरेशी, वसीम कुरेशी यांनी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना मोठी वाहनांची गर्दी झाली होती. ही गर्दी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड यांनी हटवून वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायकराव जाधव, पोलीस जमादार संघपाल पारखे तसेच पोलीस मित्र गणेश पालवे घटनास्थळी दाखल झाले.
विशेष म्हणजे, कंधार आगाराची बस भरधाव वेगाने चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले. बस चालक विष्णू जीवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे. घटनेची माहिती मिळताच जिंतूरचे आगारप्रमुख आनंद चव्हाण, वाहतूक निरीक्षक शरद पाटील, लिपिक गजानन घुगे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.