Sonpeth illegal liquor case pudhari photo
परभणी

Parbhani Crime : अवैध देशी दारूची वाहतूक; गुन्‍हा दाखल

19 हजार 200 रुपयांची देशी दारू जप्त

पुढारी वृत्तसेवा

सोनपेठ : विनापरवाना व बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगत असलेल्या तरुणाविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी 19 हजार 200 रुपयांची देशी दारू जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल बालाजी जाधव (रा.खडका,ता.सोनपेठ) हा विनापरवाना देशी दारू बाळगताना आढळून आला. त्याच्या ताब्यात खाकी रंगाचे 5 बॉक्स मिळून आले.

या बॉक्समध्ये देशी दारूच्या 180 एमएल क्षमतेच्या बाटल्या होत्या. प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या असून प्रत्येक बाटलीची किंमत 80 रुपये असल्याने एकूण मुद्देमालाची किंमत 19 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

याप्रकरणी संतोष भुसनर यांनी सोनपेठ पोलिसांत तक्रार दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि.13) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास खडका -सायखेडा रोडवरील इलेक्ट्रिक सबस्टेशनसमोरील सोनपेठ परिसरात करण्यात आल्याचे नोंदीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT