गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बेलवाडी येथील रहिवासी तथा जयपुर (राजस्थान) येथे युद्ध अभ्यासावर असलेले सैन्यातील हवालदार नारायण मंचकराव घोगरे ( युनिट ६३ क्यावलरी) यांना बुधवारी (दि.१९) रोजी युद्ध सरावा दरम्यान वीरमरण आले. गुरुवारी (दि.२१) रोजी वीर जवान नारायण घोगरे यांच्यावर बेलवाडी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील बेलवाडी येथील सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत असलेले नारायण घोगरे हे जयपूर (राजस्थान) येथे सैन्य दलात युद्ध अभ्यास कर्तव्यावर होते. युद्ध अभ्यासा दरम्यान त्यांना वीर मरण आल्याची माहिती प्राप्त आहे. दरम्यान या बाबत प्रशासकीय स्तरावरून रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. प्राप्त माहितीनुसार, उद्या गुरुवारी सायंकाळी ५ वाजता वीर जवान नारायण घोगरे यांच्यावर बेलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.