Parbhani Auto Rikshaw Accident studentts injured  Pudhari photo
परभणी

Parbhani Auto Rickshaw Accident | पूर्णेत रोडवर रिक्षा पलटून शालेय विद्यार्थी जखमी

parbhani rickshaw accident school students| पूर्णेत रोडवर रिक्षा पलटून शालेय विद्यार्थी जखमी

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : शहराजवळील पूर्णा ते झिरोफाटा मार्गावर रिक्षा रोडवर आदळून पलटी झाली. हा अपघात २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२:५० ते पावणे एक वाजे दरम्यान झाला. या अपघातात १० ते १५ शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनींना मार लागला. जखमी विद्यार्थ्यांवर पूर्णेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शिवाजी सिंगनवाड हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी झालेली वाहनांची व नागरिकांची गर्दी नियंत्रणात आणली.

याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी पूर्णा येथील एका शाळेत खासगी रिक्षाने रोज येजा करतात. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर विद्यार्थी सोमवारी दुपारी पूर्णेहून माटेगावकडे प्रवास करत होते. दरम्यान, विद्यार्थी गावाकडे घेऊन जाताना प्याजो ऑटो क्र एम एच २२ यु ४२६५ हा झिरोफाटा मेन मार्गावरील एका हॉटेल समोर येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि उजव्या बाजूला जावून रिक्षा अचानक जोरदार आदळून पलटी झाली.

हा अपघात दुर्घटनेत माटेगाव येथील समृद्धी व्यंकटी बोबडे, शिवम जनार्दन श्रिवास, वैभव तानाजी परडे, गायत्री बाबूराव बोबडे, सोनाक्षी मोहन बोबडे, सोनी गणेश बोबडे, वेदिका अरविंद बोबडे यासह १० ते १५ विद्यार्थी-विद्यार्थीनी जखमी झाल्या. त्यांच्या हाता पायाला, मानेला व अन्य ठिकाणी जबर मार लागला.

दरम्यान, घटनास्थळी आणि रुग्णालया समोर नातेवाईकासह उपस्थित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी सिंगनवाड हे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT