पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी गणपत घाटोळ तर उपाध्यक्षपदी मिनाताई भाकरे यांची निवड करण्यात आली 
परभणी

Purna Kharedi Vikri Sangh | पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी गणपत घाटोळ, उपाध्यक्षपदी मिनाताई भाकरे बिनविरोध

शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन आणि हरभरा खरेदीचे काम संघामार्फत करणार

पुढारी वृत्तसेवा

Ganpat Ghatol President, Minatai Bhakre Vice President,

पूर्णा : पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड गुरुवारी (दि. ११) बिनविरोध पार पडली. संघाच्या सर्व संचालकांच्या एकमताने अध्यक्षपदी गणपत बापूराव घाटोळ तर उपाध्यक्षपदी मिनाताई साहेबराव भाकरे यांची निवड करण्यात आली.

निवड प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी नादरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी संघाच्या संचालक मंडळातील गीताराम देसाई, बापूराव घाटोळ, तुळशीराम बोबडे, चांदोजी बोबडे, अंकुश जोगदंड, भगवान इंगोले, बालाजी भोसले, एकनाथ लोखंडे, शंकरराव बनसोडे, रामराव पांचाळ, केशव ठेंगे आणि किशनराव हातागळे यांनी एकमताने ही निवड केली.

या निवड प्रक्रियेप्रसंगी पीडीसीसी बँकेचे संचालक नंदकुमार डाखोरे, नगराध्यक्ष प्रतिनिधी नितीन कदम, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तालुका प्रभारी सुभाष देसाई, साहेबराव भाकरे, नगरसेवक राजेश भालेराव तसेच माजी अध्यक्ष बापूराव घाटोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघ हा सहकार तत्त्वावर कार्यरत असलेला तालुक्यातील महत्त्वाचा संघ असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन आणि हरभरा खरेदीचे काम संघामार्फत करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होत असल्याचे मानले जाते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघाच्या कार्याचा गौरव करताना, अनेक आर्थिक व प्रशासकीय अडचणींना सामोरे जाऊनही संघाचे कामकाज सुरू ठेवण्यात माजी अध्यक्ष बापूराव घाटोळ यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सहकार क्षेत्रातील ही संस्था आजही सक्षमपणे कार्यरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

नवनिर्वाचित अध्यक्ष गणपत घाटोळ आणि उपाध्यक्ष मिनाताई भाकरे यांच्या निवडीबद्दल शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील काळातही संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT