Parbhani Accident | उभ्या जीपला कारची जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

मानवतरोड–सेलू मार्गावरील इरळद पाटीजवळ घटना
Manwat  Selu Road Accident
Manwat Selu Road AccidentPudhari
Published on
Updated on

Manwat Selu Road Accident

मानवत : मानवतरोड–सेलू मार्गावरील इरळद पाटीजवळ बुधवारी (दि. १०) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरो जीपला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४३ एजे ८५७९ क्रमांकाची कार सेलूकडून मानवतरोडकडे येत होती. दरम्यान, रस्त्याच्या कामासाठी साहित्य वाहतूक करणारी एमएच २९ बीई ५३८१ क्रमांकाची बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने बोलेरोला पाठीमागून जोरदार धडक दिली.

Manwat  Selu Road Accident
Parbhani news | वादळीवाऱ्यात सोलार संच कोसळल्याने बागायती पिकावर गंडांतर

या अपघातात कारमधील सुरज निर्वळ (रा. सोमठाणा) आणि कैलास शिंदे (रा. हत्तलवाडी, ता. मानवत) हे दोघे गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पुरुषोत्तम भिसे यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत डॉ. रेहान आणि रुग्णवाहिका चालक भानुदास बाराहाते घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेत हलविण्यासाठी सुनील सोळंके, अंगद मोरे आणि दिलीप सोळंके यांनी मदत केली.

या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news