House Burglary  AI Photo
परभणी

House Burglary : पूर्णेत पोलिस ठाण्यासमोरच चोरट्यांनी माजी नगराध्यक्षांचे घर फोडले

सदरील घरफोडी ही अगदी पोलिस ठाण्यासमोरच झाली असल्यामुळे पोलिसावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : शहरातील पोलीस ठाण्यासमोरच अगदी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या माजी नगराध्याक्षाचे घरफोडून चोरट्यांनी नगदी रोकड पळवली आहे. ही घटना ७ जुलै रोजी रात्री घडल्याचे समोर येत आहे. परंतू, घरमालक बाहेर गावी असल्यामुळे अजून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही; असे पोलिस सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा शहरातील पोलीस ठाण्यासमोरच माजी नगराध्यक्ष स्व.सुभाषसिंह ठाकूर यांचे घर आहे. त्यांच्या पत्नी पुजा ठाकूर व कुटुंबीय बाहेर गावी घराला कुलूप लावून गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी ७ आगस्ट रोजी रात्री उशिरा घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटाचे कुलूप तोडून काही नगदी रक्कम चोरुन नेल्याचे उघड होत आहे. मात्र,नेमकी किती रक्कम चोरी गेली? शिवाय अन्य काही मौल्यवान किंमती वस्तू चोरीला गेल्या का? हे तक्रार दाखल केल्यानंतरच कळणार आहे.

दरम्यान, सदरील घरफोडी ही अगदी पोलिस ठाण्यासमोरच झाली असल्यामुळे पोलिसावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. त्याचबरोबर पोलिस ठाणे हे चोवीस तास चालू असून येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सातत्याने वावर असतो. रात्रीची पेट्रोलिंग गस्त देखील चालू असते. मग पोलिस ठाण्यासमोरच चोरी झाली कसी? पोलीस अधिकारी काय करत होते? असाही सवाल नागरीकाकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT