Jalgaon Burglary | जळगाव, भुसावळात घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २.४५ लाखांचा ऐवज लंपास

जळगावात डॉक्टरांच्या घरावर डल्ला
Jalgaon Theft Incident
Jalgaon Theft IncidentPudhari
Published on
Updated on

जळगाव : जळगाव आणि भुसावळ शहरात घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

जळगावात डॉक्टरांच्या घरावर डल्ला

जळगाव शहरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील भगीरथ कॉलनीतील राधा अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉ. उमाकांत दिलीप जावळे (वय ४२) यांच्या घरात ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान घरफोडी झाली.

अज्ञात चोरट्याने घराचे कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटाच्या लॉकरमधील २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक उल्हास हाते पुढील तपास करीत आहेत.

Jalgaon Theft Incident
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील ५० सराईत गुन्हेगार हद्दपार

भुसावळात १.८० लाखांचा ऐवज चोरीला

दुसरी घटना भुसावळ शहरातील हुडको कॉलनी परिसरातील गजानन मंदिराजवळील गजानन अपार्टमेंटमध्ये घडली. येथील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक २०२ मध्ये राहणारे अजय राजकुमार सभागचाडानी (वय ३०) यांच्या घरात ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.

मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लाकडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे मंगळसूत्र, चैन, कानातील टॉप्स, अंगठ्या, लहान मुलीचे सोन्याचे दागिने, सोन्याचे पेंडल, चांदीचे पैंजण व जोडवे तसेच ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोहम्मदअली सैयद तपास करीत आहेत. दोन्ही घरफोडीच्या घटनांतील अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत असून शहरांमध्ये वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news