Parbhani News : झरीजवळ ऑटो-पिकअपच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू file photo
परभणी

Parbhani News : झरीजवळ ऑटो-पिकअपच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

सहा जण जखमी; पाठीमागून धडक बसल्याने झाला अपघात

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News: One killed in severe collision between auto-rickshaw and pickup truck near Zari

झरी, पुढारी वृत्तसेवा : परभणी तालुक्यातील झरी येथे गुरुवारी (दि.२५) सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास ऑटो आणि छोटा हत्ती (पिकअप) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झरी येथून परभणीकडे जाणारा ऑटो आणि शेळ्या-मेंढ्या घेऊन परभणीकडे निघालेला छोटा हत्ती पिकअप (एमएच ०५ ईएल ७४९३) ही दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, समोर अचानक काहीतरी आल्याने पिकअप चालकाने अचानक ब्रेक लावले. ऑटोने पिकअपला जोरदार धडक किरण सुभाषराव देशमुख (वय ३५) हे गंभीर जखमी झाले होते.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऑटोमधील अन्य सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच झरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

रुग्णवाहिका चालक दिनेश बिरगड यांनी तत्परता दाखवत जखमींना शासकीय रुग्णालय, परभणी येथे दाखल केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT