Parbhani Municipal Corporation  Pudhari
परभणी

Parbhani Abhay Yojana | परभणी महापालिकेची ‘अभय योजना’ जाहीर; एकरकमी थकबाकी भरणाऱ्यांना १०० टक्के विलंबशास्ती माफी

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना दिलासा देत परभणी महानगरपालिकाने ‘अभय योजना’ जाहीर केली

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Municipal Corporation

परभणी : शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना दिलासा देत परभणी महानगरपालिकाने ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. १९ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत चालू आर्थिक वर्षापर्यंतची संपूर्ण थकबाकी एकरकमी भरल्यास विलंबशास्तीवर १०० टक्के सूट दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.

सध्या महानगरपालिकेकडून कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून, कर वसुलीची कार्यक्षमता वाढविणे आणि नागरिकांनी स्वेच्छेने थकबाकी जमा करावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शास्ती किंवा शुल्क पूर्णतः अथवा अंशतः माफ करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यानुसार आयुक्त नितीन नार्वेकर यांनी १७ फेब्रुवारी रोजी अधिकृत आदेश काढला आहे.

या आदेशानुसार, १९ फेब्रुवारीपासून १० मार्चदरम्यान संपूर्ण थकबाकी एकरकमी भरल्यास विलंबशास्ती पूर्णपणे माफ होईल. मात्र, हप्त्यांमध्ये कर भरणाऱ्यांना ही सवलत लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापौर सय्यद एकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या मर्यादित कालावधीतील योजनेचा लाभ घ्यावा व शहराच्या विकासासाठी आवश्यक महसूल वेळेत जमा करण्यास सहकार्य करावे.

शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी कर महसूल अत्यावश्यक आहे. त्यामुळे १० मार्चपूर्वी थकबाकी भरून १०० टक्के विलंबशास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT