Charthana Nandya Bull Death
चारठाणा येथील बैलगाडा शर्यतीत नावलौकिक मिळवलेल्या ‘नंद्या’ बैलाचा अचानक मृत्यू झाला.Pudhari

Parbhani Bull Death | अवघ्या दोन महिन्यांत ३० मैदाने मारणाऱ्या नंद्याचा चटका लावणारा मृत्यू

चारठाणा येथील बैलगाडा शर्यत विश्व शोकाकूल
Published on

Charthana Nandya Bull Death

चारठाणा : चारठाणा येथील बैलगाडा शर्यतीत नावलौकिक मिळवलेल्या ‘नंद्या’ बैलाचा शुक्रवारी (दि. १३) अचानक मृत्यू झाल्याने बैलगाडा शर्यत विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शर्यतप्रेमींनी चारठाणा येथे धाव घेतली. दुपारी सुमारे १२ वाजता मालक ऋषी दिनकर देशमुख यांच्या शेतात नंद्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागील दोन वर्षांत नंद्याने बैलगाडा शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. ऋषी देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी घेडेगाव येथून सुमारे ४६ हजार रुपयांना त्याची खरेदी केली होती. त्या वेळी तो लहान असल्याने लहानपणापासूनच त्याला शर्यतीचे प्रशिक्षण देण्यात आले. देशमुख यांना बैलगाडा शर्यतीचा छंद असल्याने त्यांनी त्याच्यावर विशेष मेहनत घेतली.

Charthana Nandya Bull Death
Parbhani News : तहसीलदारांच्या आदेशाला उच्च न्यायालयाचा ब्रेक

यावर्षी नंद्याने अवघ्या दोन महिन्यांत ३० हून अधिक बक्षिसे पटकावली होती. आडोळ (ता. सेनगाव) येथे द्वितीय क्रमांक, कासारी (ता. धारूर), वाई (ता. वसमत), पिंपळदरी व नागझरी (ता. औंढा), नाळेश्वर (ता. नांदेड) तसेच बाराशिव (ता. औंढा) येथे प्रथम क्रमांक मिळवत त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे तो शर्यतविश्वात चर्चेचा विषय ठरला होता.

नंद्याच्या देखभालीसाठी विशेष काळजी घेतली जात होती. त्याला दररोज ‘हिंदकेसरी’ खुराकासोबत पाच ते सहा लिटर दूध, शेंगदाण्याची पेंड, काजू-बदाम तसेच उडीद, गहू आणि मक्याच्या पिठापासून तयार केलेले खाद्य दिले जात होते. सकाळ-सायंकाळ नियमित सराव घेतल्यामुळे त्याची कामगिरी अधिक उजळली होती.

Charthana Nandya Bull Death
Parbhani mayor politics : मुस्लिम महापौरवरून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न

नंद्याला सुमारे १४ लाख रुपयांची मागणी आल्याचेही सांगितले जाते; मात्र मालकाने ती ठामपणे नाकारली होती. “बैलगाडा शर्यत हा माझा छंद आहे. नंद्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. पैशांपेक्षा आमच्यातील आपुलकी आणि त्याने मिळवून दिलेला सन्मान मोठा आहे,” असे ऋषी देशमुख यांनी सांगितले. नंद्याच्या अचानक निधनाने चारठाणा परिसरासह बैलगाडा शर्यत विश्व शोकाकुल झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news