जिंतूर, पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुलामुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे, या नैराश्यातून संक्राळा येथील तरुणाने आपले जीवन संपविले. ही घटना आज (दि. 6) उघडकीस आली. या घटनेची बामणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील संक्राळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर नानासाहेब पवार यांना जेमतेम शेत आहे. त्याच्यावरच त्यांचे घर संसार चालतो. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुलामुलींचे शिक्षण करण्यात आर्थिक अडचणी येत आहेत. आरक्षण देण्यास सरकार वेळकाढूपणा करत असल्यामुळे ज्ञानेश्वर पवार यांने टोकाचे पाऊल उचलले.
नातेवाईकांनी ज्ञानेश्वर पवार याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, वसंत निळे, विजय पिंपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
हेही वाचा