

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील मरडसगाव गटातील इळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज (दि.६) जाहीर झाला. महाविकास आघाडी पुरस्कृत श्री लक्ष्मी नरसिंह विकास परिवर्तन पॅनलने थेट सरपंच पदासह ९ पैकी ८ जागावर विजय प्राप्त करत स्पष्ट बहुमत मिळविले. आ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ पुरस्कृत पॅनलला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. Gram Panchayat Election Results
महाविकास आघाडी पुरस्कृत श्री लक्ष्मी नृसिंह ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या प्रभावती मारोतराव काळे या इळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी १९७ मतांनी निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रणित खजे यांच्या मार्गदर्शनाखाली मारोतराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली. श्री लक्ष्मी नृसिंह विकास परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी भीमराव धापसे, त्र्यंबक धापसे, पंडित कोराळे, बबन धरणे, गिरजाप्पा बैकरे, बळीराम जाधव, कालिदास गुडदे, ज्ञानदेव धापसे, सखाराम जाधव आदींनी परिश्रम घेतले. Gram Panchayat Election Results
आमदार गुट्टे मित्रमंडळाच्या उमेदवार सोजरबाई ज्ञानोबा धापसे यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीकडून सदस्य पदासाठी अविनाश धापसे, रेणुका माधव कोराळे, गोदावरी मारुती धापसे, विठ्ठल धोंडीराम बुरुड, शंकर नरबा बैकरे, अंजनाबाई रघुनाथ गुडदे, नागनाथ लक्ष्मण पुरी, सुनीता अवधूत धापसे हे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. आमदार गुट्टे मित्रमंडळ प्रणित पॅनलला एका विजयावर समाधान मानावे लागले.
मतदारसंघातील जनतेला परिवर्तन पाहिजे आहे. त्यानुसार परिवर्तनाची चाहूल सुरू झाली असून आगामी काळात जनतेचा रोष मताच्या रूपाने बाहेर दिवसेंदिवस येत जाईल.
इळेगाव गावातील जनता सत्ताधाऱ्यांना त्रस्त आहे. विकासशून्य व देखावा जास्त अशी परिस्थिती या परिसराची असल्याने नागरिकांनी आपला संताप मतांतून व्यक्त केला आहे.
हेही वाचा