परभणी : खळी पाटीवरील तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू | पुढारी

परभणी : खळी पाटीवरील तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू

गंगाखेड पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड- परभणी राष्ट्रीय महामार्गावरील खळीपाटी येथे इनोवा, ट्रॅक्टर व दुचाकीत घडलेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि.१) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

माहितीनुसार, बुधवारी (दि.१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा, ट्रॅक्टर व दुचाकी ही तीन वाहने समोर एकमेकांना भिडली. यामध्ये दुचाकीस्वार रोहिदास सुभाष पवार (रा.ठोळा तांडा ता.परभणी) या ३५ वर्षीय युवकाचे डोके चिरडले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य प्रवासी विजय विलास पवार हा घटनेत जखमी असून त्याच्यावर गंगाखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिहेरी अपघातातील इनोवा कार चालकाने जागेवरून पळ काढला. खळीचे पोलीस पाटील बाळासाहेब सुरवसे यांच्या माहितीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात याबाबतीत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेतील मयत रोहिदास पवार यांचा मृतदेह गुरुवारी (दि.२) रोजी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे.

हेही वाचा 

 

Back to top button