जिंतूर, चारठाणा, सेलू : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. तालुक्यातील जोगवाडा, गणेशपूर, आडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. दरम्यान पाचेगाव, रेपा, मानधानी येथील मराठा बांधवांनी भव्य रॅली काढून प्रशासनाला निवेदन दिले. या रॅलीत महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (Parbhani Maratha Andolan)
तालुक्यातील पाचेगाव, बोरी व शहरातील तहसील परिसरात चालू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसऱ्या दिवस आहे. उपोषणकर्ते बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, पंढरीनाथ शिंदे, विलास रोकडे, शशिकांत चौधरी, संतोष तळेकर यांचे आमरण उपोषण चालू आहे. Parbhani Maratha Andolan
जोगवाडा, गणेशपूर फाटा व देव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूरचे पोलीस विभागीय अधिकारी पांडुरंग गोपने यांना निवेदन देण्यात आले. तर गणेशपुर फाटा व देवगाव फाटा येथे सकल मराठा समाजाकडून सेलूचे नायब तहसीलदार अनिकेत पवार यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात अनिल भगस, बळीराम पडघन, उमेश भगस, राधाकिशन खूपसे, सतीश भगस, नागेश भगस, दत्ता काकडे, सुदर्शन ताठे, महादेव खूपसे, संतोष ताटे, पवन मोरे, साईनाथ मोगल, बालासाहेब झुंबरे, अशोक थोरात, प्रसाद मोरे, बाळू मोरे, वसंत मगर, शरद मस्के, अविनाश मस्के, सखाराम कवडे, सुनील मस्के आदीसह सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात, मागील ७ दिवसापासून साखळी उपोषण, कीर्तन व ४ दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे .त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज (दि.३१) रायगड कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा