Parbhani Cyber Crime pudhari photo
परभणी

Parbhani Cyber Crime : परभणीत निवृत्त प्राध्यापकाला १ कोटीचा गंडा; पाच जण ताब्यात

२३ लाख रुपये होल्ड तर ५.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

परभणी : डिजिटल अरेस्ट व मनी लाँड्रिंगची भीती दाखवून निवृत्त प्राध्यापकाची १ कोटी ११ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा परभणी पोलिसांनी पर्दाफाश केला.

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासातून लेयर-१ ते लेयर-११ पर्यंतचा मनी ट्रेल तपासून ५ आरोपींना अटक केली. विविध खात्यांतील २३ लाख रुपये होल्ड केले असून ५ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक आरोपींमध्ये नवी मुंबईतील एक महिला, आफताब पठाण (२४), तौफिक उर्फ बिल्ला पटेल (३४, दोघे रा. सातारा), गुरप्रीत सिंग (२५) आणि साहिल कटारिया (२६, दोघे रा. पंजाब) यांचा समावेश आहे. आरोपींकडून १९ एटीएम कार्ड, १८ सिमकार्ड, १० मोबाईल व ३३ हजार रुपये जप्त केले.

आरोपींनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे दिल्ली पोलिस व एटीएस अधिकारी असल्याचे भासवून रिझर्व्ह बँकेच्या नावाने बनावट पत्रे पाठवत पैसे उकळले. नवामोंढा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

अशा कॉलला बळी पडू नका

"कोणतीही सरकारी यंत्रणा, पोलिस किंवा सीबीआय व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट करून पैसे मागत नाही. नागरिकांनी तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा," असे आवाहन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT