परभणी

परभणी: राजेगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

अविनाश सुतार

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा:  राजेगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) जाहीर प्रवेश केला. मौजे राजेगाव येथील काँग्रेसचे सरपंच देविदासराव राठोड, उपसरपंच कचराबाई तूप, ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई तूपसुंदर, कमल नारायण राठोड, जनाबाई नामदेव राठोड, बाळू सिताराम आढे, माया अशोक गायकवाड या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी विजयराव भांबळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून  पुढील निवडणुकीसाठी सर्व ताकदीने कामास लागून ज्येष्ठ नेते शरद पवार   यांचे विचार व विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा  सल्ला दिला.

यावेळी विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, दशरथ तूपसुंदर, गणेशराव ईलग, मनोजराव थिटे, बालाजी नव्हाट, मधुकरराव भवाळे, शंकरराव जाधव, अविनाश मस्के, राहुल घुले, शेकुराव मुधवर, विलासराव मुधवर, नामदेवराव तूपसुंदर, परमेश्वर मुधवर, रामचंद्र बिरगड, बाबाराव मुधवर, सुंदरराव तीर्थे, गुलाबराव राठोड, मांगीलाल राठोड, नारायणराव राठोड, नामदेवराव राठोड, विजयराव गडदे, बबनराव चव्हाण, दतराव तुपसुंदर, संजय राठोड , बाजीराव मुधवर, विनोदराव मस्के, जीवन राठोड, बाळू आढे, विठ्ठल राठोड, बंडू माने, भास्कर अंभोरे, दीपक तुपसुंदर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT