परभणी

परभणी: एपीआय लक्ष्मण खरात यांचे कार अपघातात निधन

अविनाश सुतार

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: धुळे येथे पोलीस दलात एपीआय पदावर कार्यरत लक्ष्मण शिवराम खरात (वय ३७ ) हे शुक्रवारी सायंकाळी रेणापूर फाटा (जि.लातूर) येथे कार व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. शनिवारी रात्री उशिरा लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रविवारी (दि.८) तालुक्यातील शेंडगा या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालुक्यातील शेंडगा येथील मूळ रहिवासी तथा धुळे पोलीस दलात एपीआय पदावर कर्तव्यावर असणारे लक्ष्मण खरात शुक्रवारी रात्री धुळे येथून लातूरला परतताना रेणापूर फाटा (जि.लातूर) येथे ट्रॅक्टरला जोरदार धडक लागून झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झाले होते. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मालवली.

तालुक्यातील शेंडगा येथे दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शांत, संयमी व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे एपीआय लक्ष्मण खरात यांच्या निधनाने शेंडगा गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT