परभणी

Parbhani News : सोनपेठ नागरी बँकेत ३ कोटींचा अपहार; ७ जणांवर गुन्हा

अविनाश सुतार

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : सोनपेठ नागरी सहकारी बँकेत ३ कोटी २७ लाख ९८ हजार २५९ रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी ७ जणांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सनदी लेखापाल योगेश मानधना यांनी तक्रार दिली आहे. Parbhani News

मुद्दल, व्याज व इतर रक्‍कम मिळून ३ कोटी २७ लाख ९८ हजार २५९ रूपयांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी नंदकिशोर पुरुषोत्तम गौड, दीपक पांडूरंग आपेट, कल्याण बालासाहेब पांडुळे, अविनाश लहु साळवे, ज्ञानेश्वर राधाजी सुरवसे, विलास पंडीतराव सुरवसे, महादेवी सोमनाथ स्वामी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. Parbhani News

सोनपेठ नागरी सहकारी बँकेत लेखापरीक्षण सुरू असताना बँकेतील कर्मचार्‍यांनी रक्कमेचा अपहार, फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीने देवेंद्र जैन यांच्यासोबत लेखा परीक्षण करून अहवाल सादर केला. संबंधितांनी संगनमत करत १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत वैयक्तिक व सामूहिकपणे बोगस नोंदीव्दारे स्वतःच्या फायद्यासाठी बँकेतील रक्कमेचा गैरव्यवहार केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT