परभणी

परभणी: डोंगरपिंपळा येथे वीज पडून आई, मुलीचा मृत्यू ; मुलगा बचावला

अविनाश सुतार

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: तालुक्याच्या बहुतांश भागात आज (दि.२९) मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील शेत आखाड्यावर आज सायंकाळी ४ वाजता वीज पडल्याने आईसह मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सुदैवाने बचावला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आज दुपारी ३ वाजल्यापासून तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचे आगमन झाले. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यादरम्यान सायंकाळी ४ वाजता डोंगरपिंपळा येथील शेतकरी विठ्ठल दत्तराव कतारे यांच्या शेत आखाड्यावर वीज पडली. या दुर्घटनेत विठ्ठलराव यांची पत्नी सविता (वय ४०) तसेच मुलगी निकिता (वय १८) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेला मुलगा या दुर्घटनेत सुदैवाने बचावला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT