आई-बाबा, मतदानाचा हक्क बजावाच ! file photo
परभणी

आई-बाबा, मतदानाचा हक्क बजावाच !

परभणीतील १५ हजार विद्यार्थी पालकांना पाठवणार 'संकल्पपत्र'; सेल्फी पॉइंट, स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

Mom and Dad, be sure to exercise your right to vote

परभणी, पुढारी वृत्तसेवा :

परभणी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि प्रत्येक प्रभागातील नागरिकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून जनजागृतीचा एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, शहरातील सुमारे १५ हजार विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना 'संकल्पपत्र' देऊन मतदान करण्याचे भावनिक आवाहन करणार आहेत.

या मोहिमेचा शुभारंभ निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन नार्वेकर आणि प्रा. डॉ. गणेश शिंदे यांच्या हस्ते संकल्पपत्र व जनजागृती स्टिकरचे विमोचन करून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंब पातळीवर मतदानाबाबत जागृती निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लास या ठिकाणी विशेष जनजागृती पथके पाठविण्यात येणार आहेत. ही पथके तरुण मतदारांना आणि विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, प्रक्रिया व लोकशाहीतील जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करतील.

तसेच शाहीर काशिनाथ उबाळे हे आपल्या शाहिरीतून मतदानाचे महत्त्व पटवून देणार आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंग भोसले, विद्या मुंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माचेवाड यांच्यासह 'स्वीप' समितीचे अरविंद शहाणे, अतुल सामाले, मोहन आल्हाट, प्रफुल्ल शहाणे, प्रा. शिवाजी कांबळे, प्रवीण वायकोस, संजय पेडगावकर, त्र्यंबक वडसकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT