Parbhani News : विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू  File Photo
परभणी

Parbhani News : विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

ही घटना त्यांच्या स्वतःच्या शेतात घडली

पुढारी वृत्तसेवा

Farmer dies of electric shock

परभणी, पुढारी वृत्तसेवा पूर्णा तालुक्यातील बलसा बु. येथे रविवारी (दि.७) सकाळच्या सुमारास विजेचा जोरदार शॉक लागून ३१ वर्षीय तरुण शेतकरी एकनाथ मारोती शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या स्वतःच्या शेतात घडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकरी एकनाथ शिंदे हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात गट क्र. १६६ मध्ये मोटारपंप सुरू करण्यासाठी गेले होते. मोटारच्या वायरला कनेक्शन देण्यासाठी सिमेंटच्या वीज खांबावर चढले असता त्यांना अचानक विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या जोरदार करंटमुळे ते थेट खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील लोकांनी तत्काळ धाव घेतली आणि शिंदे यांना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या चुलत भावाने ताडकळस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनात जमादार तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव सुजलोड हे तपास करीत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT