Parbhani News : मानवत रोडला एक्सप्रेस रेल्वेंना थांबा मिळावा, आ. विटेकर घेणार रेल्वे मंत्र्यांची भेट File photo
परभणी

Parbhani News : मानवत रोडला एक्सप्रेस रेल्वेंना थांबा मिळावा, आ. विटेकर घेणार रेल्वे मंत्र्यांची भेट

व्यापारी महासंघाच्या बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Express trains should get a stop at Manavat Road, A. Vitekar will meet the Railway Minister

मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवतरोड रेल्वे स्टेशनवर प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी आ. राजेश विटेकर हे लवकरच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असून यासंदर्भात निवेदनही देणार आहेत. अशी माहिती त्यांनी मानवत शहर व्यापारी महासंघाच्या बैठकीत दिली.

सदरील बैठक शहरातील बांगड यांच्या दुकानात झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी मानवतरोड-परळी रेल्वेमार्गाच्या अंमलबजा वणीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना आ. विटेकर यांनी या मार्गाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परवानगी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मंजुरी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे असे म्हटले.

मानवतरोड रेल्वे स्टेशनपासून पाथरी शहर १६ किमी अंतरावर असून हेच शिर्डीच्या साईबाबांची जन्मभूमी मानले जाते. यामुळे येथे दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात साईभक्त येतात. माजलगाव (५५ किमी), सोनपेठ (४५ किमी) येथील नागरिकांसाठीही मानवतरोड हे जवळचे स्टेशन ठरते. मानवत शहर हे कापूस खरेदी-विक्रीचे मराठवाड्यातील अग्रगण्य केंद्र असून येथे सुमारे १६ जिनिंग व प्रेसिंग युनिट्स आहेत. त्यामुळे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा येथील व्यापारी येथे मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.

यासाठी एक्सप्रेस गाड्यांचे थांबे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच येथून जनशत ाब्दी एसप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेस (नांदेड-पुणे), काजीपेट एक्सप्रेस (सीएसटी-काजीपेट), नगरसोल एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, पुणे-निजामाबाद, अजिंठा एक्सप्रेस, फिरोजपूर एक्सप्रेस या गाड्या धावतात. बैठकीस युवानेते डॉ. अंकुश लाड, ज्ञानेश्वर मोरे, दत्तप्रसाद बांगड, कचरूलाल वर्मा, कृष्णा बाकळे, संजय नाईक, श्याम झाडगावकर, इरफान बागवान, सुरेश काबरा, सोमनाथ कडतन, प्रफुलकुमार जैन, दिलीप हिवारे, जुगलकिशोर काबरा, लक्ष्मण गुंडाळे, सतीश भावसार, रुपेश काबरा उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT