Separate Railway Zone : मराठवाडा, विदर्भ, खानदेशसाठी स्वतंत्र रेल्वे झोन करा Pudhari File Photo
परभणी

Separate Railway Zone : मराठवाडा, विदर्भ, खानदेशसाठी स्वतंत्र रेल्वे झोन करा

साऊथवेस्ट सेंट्रल रेल्वे' स्थापन करण्याचा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

Establish a separate railway zone for Marathwada, Vidarbha, and Khandesh

परभणी, पुढारी वृत्तसेवा रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी मराठवाडा, विदर्भआणि खानदेश भागांसाठी १९ वा नवीन स्वतंत्र रेल्वे झोन जाहीर करण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मराठवाडा तसेच विदर्भातील काही भाग आणि खानदेशातील काही भाग अजूनही रेल्वेच्या प्रवाशासाठी आवश्यक सुविधांपासून दूर आहे. या संदर्भात प्रवाशांच्या मागण्याकडे दक्षिण मध्य रेल्वे असो की मध्य रेल्वे असो सतत दुर्लक्षित करतात. या विभागातून नवीन गाड्या सुरू करण्यात येत नाहीत.

आहेत त्या गाड्या वेळेवर चालवण्यात येत नाहीत. येथून सुरू असलेल्या गाड्या थेट दुसर्या भागाकडे वळविण्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेता मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने एक नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे. यात दक्षिण-पश्चिम मध्य नावाने नवीन स्वतंत्र रेल्वे झोन जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठवाडा, खानदेश भागाचा विकासाकरिता सोबत विदर्भातून मुंबई, पुणे सहित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सोबत सोयीस्कर रेल्वे संपर्क साधण्यासाठी नवीन रेल्वे झोनची आवश्यकता आहे. बुलढाणा आणि बीड सारख्या जिल्हे व प्रवाशांना या झोनमध्ये जोडण्यात यावे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व जालना येथील विकसीत होणार्या औद्योगिक विकास झोन ला स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी वेगळा रेल्वे झोन आवश्यक आहे.

राज्यनिहाय रेल्वे सेवा सहजपणे सुरू करता येईल; सोबत नवीन रेल्वे झोन निर्माण केलास ग्रामीण भागावर थेट लक्ष केंद्रीत करण्यात येईल. तसेच ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल असा आशावाद या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, दयानंद दीक्षित, डॉ. राजगोपाल कलानी, रितेश जैन, श्रीकांत गडापा, माणिक शिंदे, विठ्ठल काळे आदींची नावे आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT