पूर्णा नगरपरिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा विमल कदम यांचा पदग्रहण सोहळा  Pudhari
परभणी

Ratnakar Gutte | पूर्णा शहराचा सर्वांगीण विकासातून कायापालट करणार : आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani News | पूर्णा नगरपरिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा विमल कदम यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते

पुढारी वृत्तसेवा

Purna Municipal Council News

पूर्णा : आगामी काळात पूर्णा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. यापूर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे विकासकामांना गती देत नागरी समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू. सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून लवकरच पूर्णा शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले.

आज (दि. १) दुपारी पूर्णा नगरपरिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा विमल कदम यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. शहराच्या विकासासाठी जनतेने निवडणुकीत आपल्यावर विश्वास टाकून मोलाचे सहकार्य केले असून, त्याबद्दल आपण सदैव ऋणी असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी शहरासाठी आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी थेट जनतेतून बहुमताने निवडून आलेल्या नगराध्यक्षा विमल कदम यांनी अधिकाऱ्यांकडून रितसर नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. नगरपरिषद इमारत पुष्पहार, फुलपाकळ्या व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली होती.

कार्यक्रमास आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तालुका प्रभारी नितीन कदम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक विधिज्ञ राजेश भालेराव, माजी नगरसेवक संतोष एकलारे, लक्ष्मणराव कदम पाटील, गोपाळ कदम, देवा कदम, सुधाकर खराटे, उत्तमराव ढोणे, गोपाळ बोबडे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, क. अ. मुमताजीत खान, नंदकुमार चावरे, लेखापाल पवार, मुकुंद मस्के, प्रभारी तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, लिंबाजीराव भोसले, सुदर्शन ढोणे यांच्यासह नुतन पदसिद्ध नगरसेवक मिरा होळकर, मुकुंद भोळे, लक्ष्मीबाई भालेराव, सुनील जाधव, मुजीब अब्दुल, कौशल्या भोसले, अर्चना कांबळे, हाजी खुरेशी, जाकीर कुरेशी, उत्तमदादा खंदारे, जनाबाई जोंधळे, वंदना कुलदिपके, पद्मीनबाई एंगडे, अहमद गौस, लक्ष्मीकांत कदम, राजनंदिनी पंडित, दादाराव पंडित, अर्चना अनिल खराटे, प्रकाश कांबळे, कुरेशी शेख रऊफ, मिनाक्षीबाई कदम, प्रेमिला सोळंके, पूजा कदम, शमीम बेगम शरीफ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा कदम यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हा पदग्रहण सोहळा यशस्वी करण्यासाठी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे राजू भालेराव, अमोल ठाकूर, किशोर सूर्यवंशी, विश्वनाथ होळकर, तेजबंद यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहरातील नागरिकांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कायदा, व्यापारी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT