Purna Accident | पूर्णा–चुडावा रस्त्यावर ऊस ट्रॉलीला दुचाकीची धडक; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोविंदपूर फाट्यावर अपघात
urna Chudawa Road Accident
urna Chudawa Road Bike Accident Pudhari
Published on
Updated on

Purna Chudawa Road Accident

पूर्णा: पूर्णा–चुडावा मुख्य रस्त्यावरील गोविंदपूर फाटा येथे २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऊस भरलेल्या ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने हा अपघात घडला.

या अपघातात रंगनाथ विठ्ठल राठोड (वय ४०, रा. रामनगर तांडा, ता. माजलगाव, जि. बीड; सध्या मुक्काम संभाजी उटकर यांच्या शेतात, कलमुला, ता. पूर्णा) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

urna Chudawa Road Accident
Purna Soybean Purchase | पूर्णा येथे शासकीय हमीदराने ३ हजार ९८६ क्विंटल सोयाबीनची खरेदी

मिळालेल्या माहितीनुसार, रंगनाथ राठोड हे सायंकाळी दुचाकी (क्र. एमएच २२ एबी १३५४) वरून कलमुला गावाकडे जात असताना गोविंदपूर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभी केलेली ऊस ट्रॉली (ट्रॅक्टर क्र. एमएच २३ एएस ६५५३) त्यांना न दिसल्याने धडक बसली. सदर ट्रॉलीला कोणतेही इंडिकेटर किंवा रिफ्लेक्टर लावलेले नसल्याचे सांगण्यात येते.

अपघातानंतर रंगनाथ राठोड हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस पाटील राम पांचाळ, कोतवाल शिवप्रसाद देवणे व मुरली मोरे यांनी प्रसंगावधान राखत जखमीस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

urna Chudawa Road Accident
Illegal Sand Purna | पूर्णा नदीपात्रातून गाढवावरून अवैध रेतीची वाहतूक; महसूल अधिकाऱ्यांची कारवाई

या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात ३० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर हे सपोनि किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

ऊस वाहतूक ट्रॅक्टरमुळे अपघातात वाढ

दरम्यान, पूर्णा तालुक्यातील पूर्णा–चुडावा, पूर्णा–ताडकळस व पूर्णा–झिरोफाटा या रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा अर्धशिक्षित व परवाना नसलेले चालक ही वाहने बेफिकीरपणे चालवत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. याकडे प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर निर्बंध लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news