Doctor of Science degree conferred on Dada Lad
परभणी, पुढारी वृत्तसेवा भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग उर्फ दादा लाड यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित केले.
विद्यापीठात गुरुवारी (दि.११) आयोजित २७ व्या दीक्षांत समारंभात ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. डॉ. मंगला नायर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे केलेल्या सूचनेवरून शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले. किसान संघाचे महाराष्ट्र, गुजरात, गोवा प्रांत मंत्री तथा भारत सरकारच्या कापूस संशोधन संस्थेचे सदस्य दादा लाड यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्यात आल्यानंतर ते भावूक झाल्याचे दिसले.
चंद्रकांत देशमुख, यज्ञेश कात, प्रताप काळे, श्रीकांत आखाडे, सुदर्शन जाधव, शरद पाटील, भगवान इंगोले, अण्णासाहेब जगताप, सदाशिव अडकिने या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ म्हणून गौरविण्यात आले. महिला शेतकरी गटातील मीरा जनार्दन आवरगंड, सुनंदा शिवाजी क्षीरसागर यांचाही या कार्यक्रमात सन्मान झाला.
हा सत्कार एका शेतकऱ्याचा नसून संपूर्ण शेती अवस्थेचा आहे. शेतीत कार्य करणाऱ्या सर्वांचा असल्याचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले. कृषी विद्यापीठाने कापूस, तूर, सोयाबीन या पिकांमध्ये मोलाचे योगदान दिल्याचेही त्यांनी सांगितले.