Illegal Sand Seized : अवैध वाळूच्या दोन टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त (File Photo)
परभणी

Illegal Sand Seized : अवैध वाळूच्या दोन टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिंतूर तालुक्यातील मसोबा पॉइंटवर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Contraband worth ₹14 lakh, including two tippers carrying illegal sand, seized

परभणी, पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारात पूर्णा नदीपात्रातील मसोबा पॉइंट परिसरातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर पोलिसांनी शनिवारी (दि. २७) रात्री धडक कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत तब्बल १४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन चालक व दोन वाहनमालक अशा चौघांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गंगाणे हे रात्रीच्या गस्तीवर असताना, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकासह त्यांना मसोबा पॉइंटवरून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने संयुक्तपणे मसोबा मंदिरासमोर सापळा रचला.

रात्री ११:३५ वाजण्याच्या सुमारास संशयित दोन टिप्पर येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली. चालकांकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. दोन्ही वाहनांत अवैध वाळू आढळून आल्याने पोलिसांनी दोन टिप्पर आणि ३ ब्रास वाळू असा एकूण १४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी चालक सोपान भगवान कुटे (रा. कौसडी, ता. जिंतूर), वाहनमालक नवनाथ शहाजी डोंबे (रा. बलसा, ता. जिंतूर) तसेच दुसऱ्या टिप्परचा चालक आश्रोबा गणपत गडदे (रा. निलज, ता. जिंतूर) व वाहनमालक मनोहर पुंजाराम घुगे (रा. इटोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या कारवाईत एमएच २२ एएन ५६८८ आणि एमएच २१ बीजी ४०१८ या क्रमांकाचे दोन टिप्पर जप्त केले आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक टर्के, पोलिस हवालदार वाघमारे, चुडावकर, ताटीकोंडलवार, इरशाद तसेच पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने संयुक्तपणे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT