Hingoli Crime News : ३५३ कट्टे हळद चोरीचे प्रकरण उघड

११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना केली अटक
Hingoli Crime News
३५३ कट्टे हळद चोरीचे प्रकरण उघडpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : शहरालगत लिंबाळा मक्ता येथील औद्योगिक वसाहती मधील एका गोदामातून ३५३ कट्टे हळद चोरणाऱ्या टोळीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मुख्य जणांना मंगळवारी अटक केली असून, सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

७ जून रोजी लिंबाळा मक्ता येथील स्टार अॅग्रोवेअर हाऊसिंग अँड कोलॅटरल मॅनेजमेंट लि. या वेअरहाऊसमधून हळदीच्या ३५३ कट्ट्यांची चोरी झाली होती. या संदर्भात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये तब्बल १८१ क्विंटल हळद असून त्याची किंमत सुमारे १९ लाख रुपये होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

Hingoli Crime News
Dhule Crime : धुळ्यात महिलांची मंगळसूत्रे लांबवणारी टोळी गजाआड; गुन्हे शाखेकडून चौघांना मुद्देमालासह अटक

त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस उपअधीक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव, प्रेम चव्हाण, सुभाष घुगे, विकी कुंदनानी, कोंडीबा मगरे, नितीन गोरे, धनंजय क्षिरसागर, साईनाथ कंठे यांच्या पथकाने चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये संशयीत चोरट्यांची नावे हाती लागल्या नंतर पोलिसांनी त्यांचा ठाव ठिकाणा शोधून छापासत्र सुरू केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनिय बातमीदारांच्या आधारे तपास करून चार संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये सय्यद साजीद, शेख अरबाज, सचिन उर्फ बंटी चव्हाण (सर्व रा हिंगोली), शत्रू चव्हाण (रा खरबी) यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी त्यांची सखोल चौकशीत केली. यामध्ये आरोपींनी हळद चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेली हळद आणि चोरीसाठी वापरलेले वाहन असा सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Hingoli Crime News
Kharghar theft case recovery: 94 लाखांचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द; नऊजणांना अटक
  • यामध्ये अटक केलेल्या आरोपीपैकी शत्रु चव्हाण याने हिंगोली ग्रामीण, सेनगाव, गोरेगाव आणि नर्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इतर पाच घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांची देखील कबुली दिली आहे. या गुन्ह्यांतील १७हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीकडून जिल्ह्यात झालेले आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news