मानवत: पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार येथील गायत्री बाबासाहेब अवचार हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्यप्रदेश- २०२२ या कबड्डी स्पर्धेचे ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत मध्यप्रदेश येथे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ जाहीर करण्यात आला. यात मानवत स्पोर्ट्स अॅकॅडमीची खेळाडू गायत्री अवचार हिची निवड झाली.
या निवडीबद्दल आमदार सुरेश वरपूडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे, प्रा. डॉ. माधव शेजुळ, नगरसेवक शाम चव्हाण, सर्जेराव देशमुख, ॲड. विक्रमसिंह दहे, मार्गदर्शक किशन भिसे, ज्ञानेश्वर रेंगे, ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी गायत्रीचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचलंत का ?