मराठवाडा

परभणी : भरधाव दुचाकी पुलावरून खाली पडली; दोघांचा मृत्‍यू

निलेश पोतदार

परभणी ; पुढारी वृत्तसेवा चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ पुलावरून दुचाकी खाली पडून अपघात झाला. या घटनेत दोनजण मृत झाले. यातील एकाची ओळख पटली नाही.

चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ आज (मंगळवार) सायंकाळी चार वाजता देवगाव फाटा येथून दुचाकी क्रमांक २० एफ सी 51 54 वरून धानोरा तालुका वसमतकडे जात असताना पुलाजवळ भरधाव दुचाकी पुलावरून खाली पडली. यामध्ये दुचाकीवरून दोघेजण पुलावरून पडल्याने जखमी झाले. या घटनेची माहिती मिळतात पोलीस उपनिरीक्षक विनोद साने पोलिस हेड कॉन्स्‍टेबल शेख जिलानी, दत्ता भदर्गे, जमदार कोंढरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यावर चारठाणा गावातील बाळू शिरसागर, तारीख देशमुख, रुस्तुम देशमुख, गजा गीते आदींनी या दोघांना जखमी अवस्थेत चालक इसाकोदिन दादा यांना संपर्क साधून रूग्‍णवाहिकेला पाचारण केले. दोघा जखमींना या रूग्‍णवाहिकेतून जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दुचाकीवरील कैलास गौतम मस्के (वय 30) राहणार धानोरा तालुका वसमत तर दुसऱ्याची ओळख पटली नाही. कैलास गौतम मस्के हा मृत झाला असून, दुसराही मृत झाला. या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयातून जिंतूर येथे आणण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT