मराठवाडा

पैठण : पाटेगाव येथील जुगार अड्यावर छापा

backup backup

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या पाटेगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. शनिवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी आठ जणांवर ही कारवाई करत जवळपास १ लाख २४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. डीवायएसपी व ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे हा छापा टाकून कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाटेगाव येथे जुगार खेळला जात होता. ही गोपनीय माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. शनिवारी रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान सापळा रचून पाटेगाव येथील एका खाजगी शाळेच्या बाजूच्या परिसरात ५२ पत्त्याच्या छना-मन्ना जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

जुगार खेळणारे कृष्णा कर्डिले, हनुमान नवले, दोघेही राहणार पाटेगाव, नवनाथ आरगडे, शेख रियाज अहमद, सलमान शेख, नय्युम कुरेशी, पप्पू घोरपडे, नरके पाटील सर्व पैठण येथील रहीवासी आहेत. यांच्यावर कारवाई करून जुगार खेळत असतानाचे साहित्य व ८ हजार ६८० रुपये रोख रक्कमेसह एकूण १ लाख २४ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT