सिंधुदुर्ग : गवारेड्याची कारला धडक; दोन जखमी | पुढारी

सिंधुदुर्ग : गवारेड्याची कारला धडक; दोन जखमी

सावंतवाडी,  पुढारी वृत्तसेवा : माजगाव रस्त्यावर भर वस्तीत गवारेडा घुसून रस्त्यावरील कारला जबर धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरश: चुरडा होऊन दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कारमधील चालक प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने तो बचावला. तर या अपघातात अमिता अशोक कामत (वय ६५), विश्वनाथ कामत (दोघे रा. तळवडे ता.सावंतवाडी) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

भात शेती, बागायतीच्या नुकसानीनंतर आता गवेरेडे मुख्य रस्त्यावरून धावू लागले आहेत. गवारेड्याचा कळप समाधी मंदिरासमोरून आला. त्यातील एका गवारेड्याने अचानक रस्त्यावर येऊन त्याने चारचाकीला धडक दिली. गवारेड्याच्या समोर वाहन आल्याने गव्याने त्याला जोरदार धडक दिली आणि कारला ढकलत नेले. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातनंतर वनविभागाने योग्य ते नियोजन करावे व थेट रस्त्यावर येणाऱ्या गव्यांच्या कळपांना रोखून जंगलात परत पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंच का?

Back to top button