पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यासह इतर ठिकाणी मोटर सायकल चोरी करून मौज करणाऱ्या तीन टोळीकडून पाचोड पोलिसांनी विविध ठिकाणाहून चोरलेल्या नऊ मोटरसायकली जप्त केल्या.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील पाचोड पोलिसांच्या हद्दीसह इतर ठिकाणी मोटर सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरी करून गुन्हेगार मौज मजा करीत होते. याबाबत पोलीसांना माहिती मिळाली. माहितीवरून पोलीसांनी विहामांडवा येथून आसेफ नजीर शेख,अजहर महमूद शेख,शारद महमूद शेख असे तिघांना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्याकडील नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या तिघांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
.हेही वाचा