

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे 38 वरून 33 पर्यंत घटले आहे. दोन वर्षांमध्ये प्रमाण 13 टक्क्यांनी कमी झाले आहे. मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यात महाराष्ट्र केरळनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुरक्षित मातृत्वाच्या विविध योजनांमुळे राज्याला उद्दिष्ट गाठण्यात यश येत आहे.
प्रगत देशांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2030 पर्यंत सर्व देशांमधील प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे 70 पर्यंत कमी व्हावे, यासाठी उद्दिष्ट ठरवून दिले आहे. 2018-2020 मध्ये देशातील मातामृत्यूचे प्रमाण 103 इतके होते. त्यानंतर, 2020-22 या कालावधीत 97 पर्यंत म्हणजेच 6 टक्क्यांनी घटले आहे.
सुरक्षित मातृत्वासाठी 'लक्ष्य' कार्यक्रम
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य संस्थांचे डिलिव्हरी पॉईंटमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. वर्ग-1 मध्ये उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, वर्ग-2 मध्ये ग्रामीण रुग्णालये आणि काही प्रा. आरोग्य केंद्रे, वर्ग-3 मध्ये जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे. 'लक्ष्य' कार्यक्रमांतर्गत 195 आरोग्य संस्थांची निवड करण्यात आली असून, प्रसूतीगिह आणि शस्त्रक्रियागृहांचे बळकटीकरण करण्यात आले आहेत.
मातामृत्यूची प्रमुख कारणे आणि टक्केवारी
1) प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव : 18 टक्के
2) प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब : 16 टक्के
3) प्रसूतीपश्चात जंतुदोष : 10 टक्के
4) तीव्र रक्तक्षय : 4 टक्के
राज्यातील मातामृत्यूचे घटते प्रमाण
वर्ष – मातामृत्यू दर क्ष जन्मामागे)
2001-03 : 149
2003-05 : 130
2005-07 : 104
2007-09 : 87
2009-11 : 68
2011-13 : 61
2013-15 : 55
2015-17 : 46
2018-20 : 38
2020-22 : 33
देशातील मातामृत्यूचे प्रमाण (राज्यनिहाय)
केरळ : 19
महाराष्ट्र : 33
तेलंगणा : 43
आंध—प्रदेश : 54