Sword Attack : तलवारीने वार करून तरुणाला संपवले File Photo
नांदेड

Sword Attack : तलवारीने वार करून तरुणाला संपवले

वजिराबाद पोलिसांकडून दोघे भाऊ जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

Young Man Killed in Sword Attack

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

गुन्हेगारी वर्चस्ववादातून शुक्रवारी (दि.३) मध्यरात्री सदा आणि साईलाला या दोन गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये तिघे ठार असतानाच पुन्हा नांदेडमध्ये शनिवारी रात्री एका तरुणावर शहरातील मुरमुरा गल्लीत तलवारीने वार करून त्याचा निघृण खून करण्यात आला. दोन दिवसांत चार खून झाल्याने शहरात सध्या दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, मुरमुरा गल्लीत खून करणाऱ्या दोघा सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

नांदेडमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे. शुक्रवारच्या तिहेरी हत्याकांडानंतर शनिवारी पुन्हा एका दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा बळी गेला आहे. शहरातील मुरमुरा गल्लीत रात्री रंजीतसिंग तबेलेवाले (२६, रा. गुरुद्वारा गेट नंबर ६ जवळ) याचा पूर्ववैमनस्यातून मनप्रितसिंग परविंदर सिंग काचवाले व परमज्योतसिंग काचवाले या दोन सख्ख्या भावांनी तलवारीने सपासप वार करून खून केला.

अचानक घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गजबजलेल्या मुरमुरा गल्लीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. रंजीतसिंग तबेलेवाला याचा जागीच मृत्यू झाला असून, वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा भावांना अटक

पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून इतवारा भागातून खून प्रकरणातील आरोपी मनप्रितसिंग व परमज्योतसिंघ काचवाले या दोन्ही भावांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत खुनांच्या घटनांमुळे शहरात भीतीदायक वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शहरात वाढलेली गुंडगिरी, गैंगवॉर संपुष्टात आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT