Child Marriage  File Photo
नांदेड

Child protection law enforcement : सावधान ! बालविवाह करताल तर जेलची हवा खाल!

जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, पोलिस प्रशासनाची असणार करडी नजर

पुढारी वृत्तसेवा

शेख फेरोज

डोणगाव ः जाफराबाद तालुक्यात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास आता गय केली जाणार नाही. मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे 21 वर्ष या कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन जर कोणी बालविवाहाचा घाट घातला, तर संबंधित पालकांसह, लग्न लावणारे, मंगल कार्यालय मालक आणि वऱ्हाडी मंडळींवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.

बालविवाह हा केवळ सामाजिक शाप नसून तो एक गंभीर अजामीनपात्र गुन्हा आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार खालील बाबी घडल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळल्यास 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते व 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

या विवाहाला केवळ आई- वडीलच नव्हे, तर लग्न लावणारे पुरोहित, वाजंत्री, फोटोग्राफर आणि लग्नाला उपस्थित राहणारे पाहुणे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. बालविवाह हा केवळ कुटुंबाचा प्रश्न नसून सामाजिका प्रश्न आहे. या कुप्रथेचे समुळ उच्चाटन होणे गरजेचे आहे. यासाठी शासनासह सेवाभावी संस्था आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने हे काम होत आहे.

61 बालविवाह रोखले

जाफराबाद तालुक्यात 1 जानेवारी 2024 ते 23 जून 2025 पर्यंत 16 बालविवाह रोखले आहे. तर मागच्या सात महिन्यांपासूत आजपर्यंत जालना जिल्ह्यात सुमारे 61 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

चाईल्ड हेल्पलाईन

चाइल्ड हेल्पलाईन: 1098

पोलीस नियंत्रण कक्ष: 100

स्थानिक तहसीलदार किंवा ग्रामसेवक कार्यालय येथे संपर्क साधावा. या वाईट प्रथेचा समुळ उच्चाटनासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे.

मंगल कार्यालय आणि लॉन मालकांना कडक सूचना- तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय मालक, लॉन आणि वाजंत्रीवाल्यांना लग्नापूर्वी वधू- वरांच्या वयाचे अधिकृत दाखले (आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला) तपासणे बंधनकारक आहे. विना शहानिशा लग्न लावल्यास संबंधित कार्यालयाचा परवाना रद्द करून मालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. शिवाय, शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात येते. बालविवाह हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून तो सामाजिक गुन्हा आहे. याबाबत पालकांचा समजावून सांगण्यात येते. -
बाबासाहेब खार्डे, पोलिस उपनिरीक्षक, टेंभुर्णी.
आम्ही केवळ विवाह थांबवत नाही, तर विवाह लावणारे पुरोहित, मंगल कार्यालय मालक, छपाई करणारे आणि दोन्ही बाजूंचे पालक यांच्यावरही गुन्हे दाखल करतो. तक्रारीची गुप्तता आणि तत्परता अनेकदा लोक ओळखीच्या भीतीपोटी तक्रार करत नाहीत. बालविहाव प्रथा वाईट आहे. प्रथेची समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे.
कैलास भारती, पोनि. पोलिस ठाणे टेंभुर्णी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT