Three people involved in marijuana trafficking have been arrested.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील शिवाजीनगर येथील नई आबादी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन किलो २०० ग्रॅम एवढा ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी मंगळवारी दि. ३० रोजी तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना गुप्त माहितीदाराकडून गांजा तस्करीची माहिती मिळाली. खंडेराय यांनी तातडीने सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार यांना पाठवून शिवाजीनगर येथील नई आबादी जवळ भाजीपाल्या गाड्याच्या बाजूस इसाक मोहम्मद युसुफ (वय ५०) रा., शेख अनिस हे दोघे रा. नवी आबादी, शिव ाजीनगर नांदेड व शंकर ऊर्फ भोला पि. अशोक वगरे रा. जयभीमनगर, नांदेड जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या कडे ५० हजार रुपये किंमतीचा दोन किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदयाच्या तरतुदीचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी गांजा कुठून आणला आणि कुणाला विकणार होते याबाबत पोलिस तपास करीत आहेत.