Weather Machine : जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार ! file photo
नांदेड

Weather Machine : जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार !

खा. रवींद्र चव्हाण यांच्या मागणीची केंद्र सरकारने घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

The process of installing an automatic weather machine in the district will speed up

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : विंड्स प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्याची प्रक्रिया नांदेड जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबाबत खासदार चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले असता या पत्राची केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अत्यंत गांभीयनि दखल घेतली असून, महाराष्ट्रात ही प्रक्रिया जलद गतीने राबवण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या आणि फळबागांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला आहे. वातावरणातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर हवामान यंत्रे उपलब्ध नसल्याने या बदलांची अधिकृत व योग्य नोंद होत नाही. याचाच गैरफायदा घेऊन पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना हवामान आधारित पीकविम्याचा लाभदेण्यास तांत्रिक अडचणी निर्माण करतात.

ही गंभीर बाब खा. रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नांदेड जिल्ह्यात ही यंत्रे त्वरित बसवण्याची मागणी केली होती. खा. रवींद्र चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कळवले आहे की, या मागणीची योग्य दखल घेण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचा फायदा : खा. रवींद्र चव्हाण

केंद्रीय पातळीवरून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादानंतर खासदार रवींद्र चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे. नदिड जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान यंत्रे जलद गतीने बसवल्यास वातावरणातील प्रत्येक बदलाची अचूक नोंद होईल. यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास पीकविमा कंपन्यांना तांत्रिक अडचणी पुढे करता येणार नाहीत आणि नांदेड जिल्ह्यातील एकही शेतकरी हवामान आधारित पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा ठाम विश्वास खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT