Nanded News : मुदखेड तालुक्यात पेरण्या पूर्ण; मोठ्या पावसाची प्रतीक्षा file photo
नांदेड

Nanded News : मुदखेड तालुक्यात पेरण्या पूर्ण; मोठ्या पावसाची प्रतीक्षा

२१ जुलैपर्यंत २५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Sowing completed in Mudkhed Taluka; awaiting heavy rainfall

मुदखेड, पुढारी वृत्तसेवा : सुरूवातीला झालेल्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण केली असली तरी अद्यापपर्यंत जोरदार पाऊस न झाल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरीही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा मात्र हवालदिल झाला असून खरीप हंगामात पेरणी उरकून बळीराजा मोकळा झाला मात्र समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. २१ जुलै रोजी संततधार पावसाला सुरुवात झाली खरी या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडावर समाधान दिसत आहे पुन्हा पावसाचा खंड पडला असल्याने तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरीही समाधानकारक पाऊस झाला नव्हता तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकून घेतल्या पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली मुख्य पिक म्हणजे सोयाबीन असून सोयाबीन कोळपणी झालेली आहे फक्त पावसाची वाट पाहत शेतकरी चिंताग्रस्त होता पुन्हा दुबार पेरणीचे संकट डोळ्यासमोर उभे असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.

मुदखेड तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ८२९ मिलीमीटर असून पावसाळी हंगामात दि. २१ जुलैपर्यंत २५१ मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र १९ हजार २८५ हेक्टर असून खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ११४ हेक्टर, तुर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ९५० हेक्टरवर लागवड झालेली आहे. पुढील २९६ हेक्टर ३८१ हेक्टर मका २० हेक्टर हळद २००४ हेक्टरवर लागवड करण्यात आलेली असून पिकांची चांगल्याप्रकारे उगवन झालेली असून वाढही बऱ्यापैकी झाली आहे.

दरम्यान, यंदा हवामान विभागाने वर्तविल्याप्रमाणे अलनिनोचा प्रभाव जाणवत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाचा थेंब न थेंब वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच पाण्याचा आवश्यकतेनुसारच उपयोग करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ. अमरज्योती गच्चे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT