

Sexual assault under the pretext of marriage; case registered under the POCSO Act
अर्धापूर, पुढारी वृत्तसेवाः अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी बारावीत शिक्षण घेते असून तिचे तालुक्यातील पाटनूर येथील तिच्या नातेवाईकाकडे गावात येणे-जाणे सुरु होते. यातच तिची ओळख गावातील एकसोबत झाली.
दरम्यान, सदर मुलीला लग्राचे आमिष दाखवले. मुलीचे कुटुंबीय लग्रासाठी बाहेरगावी गेल्यामुळे आरोपीने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व लग्राचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार आरोपीने आपल्या नातेवाईकांना पीडितेच्या घरी आगले. लग्नाचा विषय निघताच आरोपी अंसाजी शिंदे याने लग्रास नकार देत धमकी देऊन निघून गेला.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुरेश भोसले हे करीत आहेत.