Shankarao Chavan and BJP leaders together in the banner!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : काँग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी भाजपाच्या पहिल्या फळीतील तत्कालीन नेत्यांशी राजकीय उराणि वैचारिक पातळीवर आवश्यक ते अंतर राखण्याची खबरदारी नेहमीच घेतली; पण त्यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त स्थानिक समर्थकांनी शंकरराव आणि भाजपाच्या विद्यमान नेयांना डिजीटल फलकांच्या माध्यमातून एकत्र आणले आहे!
मराठवाडयाच्या जलसंस्कृतीचे अध्वर्यू ही आपली ओळख निर्माण करणाऱ्या शंकररावांची सोमवारी १०६वी जयंती असून त्यानिमित्त त्यांचे पुत्र व भाजपा खासदार अशोक चरहाण यांच्या स्थानिक समर्थकांनी शहरभर, मोक्याच्या जागी लावलेल्या फलकांमध्ये भाजपाच्या केंद्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची छायाचित्रे प्रकाशित केल्याचे दिसत आहे.
शंकरराव चव्हाण यांच्या निधनास गतवर्षी (२०२४) २० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या पश्चात अशोक चच्हाण यांनी जिल्ह्यातील तसेच राज्यातील कॉंग्रेसचे नेतृत्व करताना भाजपाच्या बावतीत राजकीय व वैचारिक पातळीवर आपल्या पिताश्रींचीच भूमिका सातत्याने पुढे रेटली पण याच वर्षात त्यांनी आपल्या परिवारासह भाजपामध्ये प्रवेश केला, गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगांत आपल्या जुन्या पक्षावर त्यांनी टिकेचे चाण सोडले. आता त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे दिवंगत नेते अशी ओळख असलेले शंकरराव आणि भाजपाच्या विद्यमान नेत्यांना गोदाकाठी 'एका नालेचे प्रवासी' केल्याचे दृश्य कॉग्रेसजनांना बघावे लागत आहे.
शंकररावांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे जितरण सोमवारी दुपारी येथे होणार असून या कार्यक्रमासाठी चव्हाण परिवाराने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना आमंत्रित केले आहे. बागडे हे जनसंघापासून त्या परिवारात राहिले असून भाजपाने त्यांना राज्यात मंत्री, विधानसभा अध्यक्ष या पदांवर संधी दिल्यानंतर आता त्यांची व्यवस्था जयपूरच्या राजभवनात केली आहे.
शहरातील काही फलकांवर भाजपा नेत्यांसोक्त राज्यपाल बागडे यांचेही छायाचित्र बघायला मिळाले भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर तसेच प्रमुख रस्त्यांलगतच्या भल्यामोठ्या फलकांद्वारे काँग्रेसच्या दिवंगत नेत्यास अभिवादन आणि राज्यपाल बागडे यांच्या स्वागताचा योग साधताना त्यावर भाजपाच्या केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या छायाचित्रांची पेरणी केली आहे. अन्य काही उत्साही कार्यकर्त्यांनीही त्याचेच अनुकरण केल्याचे दिसून आले. या निवमबाह्य फलकबाजीकडे मनपा प्रशासनानेही डोळेझाक केल्याचे दिसत आहे.
शंकरराव बव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण तसेच पक्षातील प्रमुख कार्यकत्यांनीही त्यांना अभिवादन करणारे फलक लावले आहेत. राज्यपाल बागडे यांचा कार्यक्रम ज्या वृत्तपत्रातफे आयोजित केला आहे, त्या वृत्तपत्राने मात्र फलकांतून शिष्टाचार पाळल्याचे दिसून आले. भाजपाच्या केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे त्यातून वगळण्यात आली आहेत. या कार्यक्रमात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सुरेश सावंत, डॉ नितीन जोशी प्रभृतींचा सन्मान केला जाणार आहे.