Nanded Rape case crime news
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या संजय गोविंदराव गाडगे (वय ३५) याला आज न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एक महिला शेतात पतीसमवेत काम करीत होती. संबंधित महिलेचा पती बाहेर गेल्यानंतर ती एकटीच असल्याची संधी साधून संजय गाडगे यांनी जबरदस्तीने तिच्यावर अतिप्रसंग केला.
या प्रकरणानंतर त्या महिलेने तामसा पोलिस ठाणे गाठले. २१ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या घटनेत पोलिसांनी संजय गाडगेला तात्काळ अटक केली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. किरवले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
या प्रकरणात न्यायालयाने नऊ साक्षी जणांच्या नोंदवल्या. त्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद व उपलब्ध पुराव्याच्या आधारे अतिरिक्त सत्र न्या. आर. व्ही. कोकरे यांनी आज या प्रकरणाचा निकाल देताना संजय गाडगे याला १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू अड. एम. ए. बत्तुल्ला यांनी मांडली.