Railways arranges three special trains on the occasion of Ashadhi Ekadashi
नांदेड, पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दिंड्या रवाना झाल्या आहेत. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनेसुद्धा ५ व ६ जुलै रोजी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिली गाडी (क्र, ०७५१५ /०७५१६) नगरसोल मिरज ही विशेष गाडी ५ जुलै रोजी नगरसोल येथून सायंकाळी ७ वाजता निघणार असून रविवारी दुपारी ४ वाजता मिरजेला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी रविवारी दि.६ रोजी निघेल. या प्रवासात रोटेगाव, लातूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातुर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुरुर्डवाडी व पंढरपूर या स्थानकावर थांबेल.
दुसरी गाडी (क्र. ०७५०५ /०७५०६) अकोला मिरज अकोला या मार्गावर धावेल. दि.५ जुलै रोजी अकोल्याहून सकाळी ११ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ११ वाजता मिरजेला पोहचेल. दि.६ रोजी दुपारी २.१५ वाजता मिरजेहून निघून सोमवारी दुपारी सुमारे ५ वाजता अकोल्याला परतेल.
सदर गाडीच्या प्रवासात वाशिम, हिंगोली, वसमत, पुर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहीराबाद, हरंगूळ, विक्राराबाद, तांडूर, तेरंग, सीतपूर, कलबुर्गी, सोलापूर, कुरुर्डवाडी व पंढरपुर ही स्थानके आहेत.
तिसरी गाडी (क्र. ०७५०१/०७५०२) अदिलाबाद पंढरपूर अदिलाबाद ही गाडी दि.५ रोजी सकाळी ९ वाजता अदिलाबादहून निघून रात्री १२.३० वजता पंढरपुरला पोहचेल. रविवार रात्री ११ वाजता पंढरपूरहून निघून सोमवारी दुपारी ३ वाजत अदिलाबादला पोहचेल. या गाडीच्या मार्गात किनवट, बोधडी, धानोरा, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पुर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातुर रोड, लातुर, उस्मानाबाद, कुरुर्डवाडी ही स्थानके आहेत.