Social media defamation Pudhari
नांदेड

पंतप्रधानांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

उमरखेड पोलीसांकडून तक्रारीची दखल; पुढील तपास सुरू...

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : सोशल मीडियावरील एका सार्वजनिक ग्रुपमध्ये पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी याबाबत उमरखेड पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पोस्टमुळे समाजात गैरसमज व तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, “यवतमाळ ग्रुप” या फेसबुक ग्रुपमध्ये दिपक जिठ्ठे नावाच्या व्यक्तीकडून एक आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला. या ग्रुपमध्ये सुमारे ९५०० सदस्य असून, पोस्ट मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचली आहे. संबंधित मजकूरात पंतप्रधानांविषयी गंभीर, असभ्य व बदनामीकारक आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, ही पोस्ट जाणीवपूर्वक व द्वेषातून पसरवण्यात आली असून, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. तसेच अशा प्रकारच्या पोस्टमुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच पोस्टचा स्रोत, संबंधित मोबाईल क्रमांक, IP अ‍ॅड्रेस व इतर डिजिटल पुरावे तपासून सत्य समोर आणावे, अशी विनंती करण्यात आली आहे. उमरखेड पोलीसांकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT