Pistol News : नांदेडमध्ये पिस्टल खरेदी-विक्री वाढली... file photo
नांदेड

Pistol News : नांदेडमध्ये पिस्टल खरेदी-विक्री वाढली...

तीन अट्टल गुन्हेगारांकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त

पुढारी वृत्तसेवा

Pistol buying and selling increased in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहरात वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे, गेल्या काही दिवसांत पिस्टलचा खरेदी विक्री वाढली आहे तसेच पिस्टलचा वापरही वाढला आहे. गेल्या सहा दिवसांत गुन्-हेगारांकडून पोलिसांनी चार पिस्टल व काडतुसे जप्त केले आहेत. गुरुवारी ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गुन्-हेगारांकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, खंजर जप्त केली आहे. त्यामुळे नांदेड शहरात पिस्टल विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लुटमारी, चोऱ्या, खंडणी मागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यातच अनेक घटनांत पिस्टलचा सर्रास वापर वाढला आहे. त्यामुळे शहरातील जनतेत एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच सहा दिवसांत पोलिसांच्या पथकाने जवळपास विविध भागांतून चार पिस्टल जवळपास चाळीस जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. त्यामुळे ही नांदेड शहरात येणारे पिस्टल कसे येतात आणि कुठे विक्री केल्या जात आहेत याचा पोलिसांना शोध लागत नाहीत. केवळ पोलिस कारवाईत पिस्टल जप्त व आरोपी अटक केल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पिस्टल खरेदी विक्रीचे केंद्र बनलेल्या नांदेडमध्ये हे रॅकेट कोण चालवत आहे. त्या सूत्रधाराचा शोध घेणे आवश्यक आहे.

शहरातील विमानतळ ते महादेव मंदीर रस्त्यावरील आसरा नगर जवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या पथकाने सय्यद शाहेद ऊर्फ पटेल सय्यद दस्तगीर वय २२, दीपक ऊर्फ छक्या विनोद भोकरे वय २६ या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व खंजर आढळून आले. या दोघांनी निखिल ऊर्फ चिंट्या घोरपडेकडून ही पिस्टल खरेदी केल्याची माहिती दिली. त्यावरून तिघांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य सुत्रधार सापडेना

गेल्या काही दिवासांपासून शहरात पिस्टल व जिवंत काडतूस वापर करणाऱ्या जवळपास सात जणांवर कारवाई करत चार पिस्टल, चाळीस जिवंत काडतुसे जप्त केले, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली मात्र, पिस्टल खरेदी विक्रीचा व्यवहार करणाऱ्या व हे रॅकेट नांदेडमध्ये मोठ्याप्रमाणात चालविणाऱ्याचा शोध लावण्यात यंत्रणेला अपयश आल्याचे दिसते, त्यामुळे यातील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतल्यास पिस्टल रॅकेटचा पर्दाफाश होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT