Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगाराकडून पिस्टल, १८ जिवंत काडतुसे जप्त

एलसीबी पथकाची कारवाई; नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा
Nanded Crime
Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगाराकडून पिस्टल, १८ जिवंत काडतुसे जप्तfile photo
Published on
Updated on

Pistol and 18 Live Cartridges Seized from Criminal in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहरात वाढती गुन्हेगारी ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातच पिस्टलचा वापर ही वाढला आहे. एलसीबीच्या पथकाने बुधवारी छापा टाकून एका गुन्हेगाराकडून एक पिस्टल व १८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

Nanded Crime
Crime News : अश्पाक पटेल गँगची नशा उतरवली !

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एलसीबी पोलिसांच्या पथकाचे वजिराबाद परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हस्सापूर येथे एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असताना सापळा रचून पथकाने ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व १८ जिवंत काडतुसे सापडले. नागेंद्र ऊर्फ दत्ताहरी भारती (वय २२) रा. जिंदमनगर गोपाळ चावडी, नांदेड यास असे पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केली.

Nanded Crime
Knife Attack : पाण्याचा ग्लास देण्यास नकार देताच पोलिसावर चाकूहल्ला

भारतीने पिस्टल कुणाकडून आणली. पिस्टल कुणाला देणार होता का यासह अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहेत. चार दिवसांपूर्वी डी गँगच्या रवी ठाकूर याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन पिस्टल, तीन मॅग्जीन व १० काडतुसे जप्त केले होते.

त्यानंतर भारतीकडून आज पिस्टल व १८ काडतुसे जप्त केल्याने नांदेडमध्ये पिस्टल तस्करीचे केंद्र बनले आहे का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, ही कारवाई एलसीबीची पथकाचे पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलिस जमादार सुनील गटलेवार, श्रीराम दासरे, माधव माने, संघरत्न गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news