Nanded Crime News : पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त; एकास अटक file photo
नांदेड

Nanded Crime News : पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pistol and live cartridge seized; one arrested

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. अवैधपणे कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे व त्यांचे पथक ३ ऑक्टोबर रोजी नांदेड ग्रामीण उपविभागात गस्तीवर होते. दरम्यान, मुदखेड येथील उमरी रोडवरील 'संकल्प बार' समोर एक इसम बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगून उभा असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून पोलिसांनी दोन पंचांसमक्ष सायंकाळच्या सुमारास संकल्प बारसमोर छापा टाकला.

या कारवाईत संशयित इसम माधव बालाजी देशमुख (वय २७, व्यवसायः चालक, रा. कृष्णानगर, मुदखेड) याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३० हजार रुपये किमतीचे विनापरवाना गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्तूल (मॅगझीनसह) आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव देशमुख याच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १८९/२०२६) दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सपोनि रवी वाहूळे, पोउपनि बळीराम दासरे, पोउपनि माधव केंद्रे तसेच देविदास चव्हाण, मोतीराम पवार व सोनसळे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT