Nanded News : शेतात विद्युत मोटार चालू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या दुर्देवी मृत्‍यूमुळे गावावर शोककळा
Nanded News
Nanded News : शेतात विद्युत मोटार चालू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्‍यूfile photo
Published on: 
Updated on: 

मुखेड : पुढारी वृतसेवा शेतीतील तूर पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार चालु करण्यसाठी गेलेल्या शेतक-याचा शॉक लागुन मृत्‍यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ही घटना मुखेड तालुक्यातील सलगरा (बु) या गावात दि. शनिवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान घडली.

Nanded News
Agriculture News : तीन एकर मिरची पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर!” “लाखोंचा खर्च, उत्पादन अन् भावही नसल्याने उभे पीक जमिनीत गाडले..

या बाबत सविस्तर वृत असे की, सलगरा ( बु) येथील अल्प भुधारक शेतकरी माधव प्रल्हाद हलबुगे वय अंदाजे 55 हे सलगरा बु शिवारातंर्गत आपल्या शेतातील तुरीला पाणी देण्यासाठी नदीकाठी असलेल्या आपली विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेले होते. मोटार चालु करत असताना विजेचा शॉक लागल्याने ते जागेवरच पडले.

Nanded News
ST Bus Accident : धावत्‍या एसटीची पुढची दोन्ही चाके निखळली, बस सुमारे २० फूट फरफटली, प्रवाशांमध्ये घबराट..

ही घटना कळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवुन त्यांना उपजिल्हा रुग्नालय मुखेड येथे उपचारासाठी आणले. यावेळी कर्तव्यावर असलेले डॉ. बालाजी गरुडकर यांनी त्याना तपासून मृत घोषीत केले. मृत माधव हलबुगे अल्प भुधारक शेतकरी असुन ह्या शेतीवर त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहीत मुली असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news